Monday, November 16, 2009

सांग मला......

खूप काम होते आज तुला,
थकलीइतकी की झोपूनच राहिलीस,
लवकर उठ मला भूक लागली,
आज गप्प आहेस इतकी, काय झाले तुला, सांग मला ?

हे सारे रडत आहेकशाला,
काकू का मला इतके घट्ट धरतेय?
बाबा पण दीदीला जवळ घेउन बसले,
तूच का नाही मला जवळ घेत , सांग मला ?

आकाशातील तो गोलस दिवा विझला,
पण अजुन तू घरातील दिवा नाही लावलास ,
मी चार ओळ शुभंकरोतिचे पाठ केले ,
पण बाबा त्याला चूक का म्हणाले, सांग मला?


उठ आई आता किती झोपणार,
माझ्या लहानश्या हाकेने उठणारी तू,
आज इतके लोक भोवती असता पण झोपलीस,
कोणी रागावले का तुला, सांग मला?

कसेतरी होते आता मला,
इतकी गर्दी आणि सगळे विनाकारण रड्तायत ,
मला पण रडू येते,
अश्रु पूस पदराने आई, आणि बरं वाटेल सं काही सांग मला.


मी काल खेळण्यासाठी हट्ट केला,
म्हणून रागावली नाहीस ना?
की आज पुन्हा भाजी उरली,
म्हणून राग आला माझा तुला, सांग मला ?

हो! माझा नक्कीच राग आलाय तुला,
म्हणून इतका वेळ गप्प होतीस ,
डोळे मिटून त्या सफ़ेद पांघरुणा झोपलीस ,
मला एकदाही पहावेसे वाटले नाही तुला, सांग मला ?

ह्याच क्षणी मी वचन देतो तुला,
हट्ट नाही करणार खेळण्यासाठी कधी ,
तू वाढलेली भाजी सुध्दा गपचुप खाणार,
काय करू की राग जाईल तुझा सांग मला ?

कुठे नेतायत हे सारे तुला,
बाबा म्हणतात तू कामासाठी परदेशी चाललीस ,
सगळे तुझ्या सोबत घराबाहेर पडतायत, मला सोडून,
जिथे तू चाललीतिथे सोबत का नेत नाही मला, सांग मला?

4 comments:

  1. nakki kay bolayach ahe tula tech mala nahi kalat ahe..........

    ReplyDelete
  2. sheh! i thot it was obvious the mother's dead n d child is tryin 2 convey his thoughts....wel, i'll try harder nxt tym :)

    ReplyDelete
  3. hey very good poem....
    written well initial 3 paragraphs gives clear idea of wat the poem is all about...
    it was really heart touching....
    it reminded me of ur school days marathi lessson "Angnatil popat".
    really a good one..

    ReplyDelete
  4. This is gud poetry. U shud kp at it! :)

    ReplyDelete