जीवनाच्या सहलीला निघालो घरातून,
कधी सावली तर कधी डोक्यावर उन,
पावसाच्या सरी, गारव्याची शीत,
मनाला समजाविले, कोणाला आहेस भीत?
घरच्यांच्या पाठिंबा, मित्रांची साथ,
प्रत्येक संकटाला देउया मात,
सुख- दुखांच्या खेलानेच रमते ही सहल,
क्षणभराच्या अंतरावर असते काही नवल,
प्रत्येक उदय काही शिकवितो,
प्रत्येक अस्त हलूच बोलतो,
असतात दडलेली उत्तरे त्यात अनेक,
आहे प्रश्ण माझा फक्त एक,
कुठे आहे या सहलीचा अंत,
उत्तर सापड़ने वाटे कठिन अत्यंत,
पण अन्तापेक्षा वाट जरुरी,
काय अंत हे कोण विचारी,
खर्या अर्थान तोच जगला,
ह्या सहलीचा आनंद घेणे जो शिकला.
No comments:
Post a Comment